मुखपृष्ठ बचत गट चळवळी विषयी महाराष्ट्र शासनाची भूमिका MSRLM Advt. बचत गट व उत्पादने संपर्क साधा
*सुस्वागतम *   या संगणक प्रणालीचे उद्घघाटन ना. श्री. जयंतराव पाटील , मा. मंत्री,  ग्रामविकास महाराष्ट्र शासन यांच्या शुभहस्ते दिनांक 23 ऑगस्ट 2011 रोजी संपन्न झालेले आहे...

ग्रामविकास विभागाचा क्रांतिकारी, प्रगतिशील निर्णय - ग्रामीण बचत गट संगणक प्रणाली

राज्यात दारिद्र्य निर्मूलनासाठी स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार ही  75% केंद्र पुरस्कृत योजना सन 1999 पासुन राबविण्यात येते. या योजनेमध्ये गटसमुहाला प्राधान्य देण्यात आले आहे. स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार यॊजना सुरू झाल्यापासुन राज्यात रु. 1722 कोटी इतका निधी आजतागायत खर्च करण्यात आला आहे. या योजने अंतर्गत 12.56 लाख स्वरोजगारींना अनुदान व बॅंक कर्ज देण्यात आले आहे. त्यापैकी अनुसुचित जातीच्या 3.17 लाख लाभार्थीना, तसेच अनुसुचित जमातीचे 2.33 लाख, महिला 9.15 लाख, अपंग व्यक्ती 16,716 व अल्पसंख्यांक घटक 58,578 इतके आहेत. तसेच स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेमधुन विविध बॅंकांकडून रु.2176 कॊटी कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

सन 1999 पासून मार्च 2011 पर्यंत या योजने अंतर्गत एकूण 2,54,673 स्वयंसहायता गट स्थापन झाले असुन त्यातील 80,842 गटांनी आपले उपक्रम सुरू केले आहेत. या एकूण गटांमध्ये 2,01,817 गट महिलांचे असून त्यातील 71,713 महिला गटांनी उपक्रम सुरू केले आहेत. एकूण स्थापित गटांपैकी प्रथम वर्गवारी प्राप्त झालेले गट 1,84,697 इतके असून द्वितीय वर्गवारी 98,544 इतक्या गटांनी प्राप्त केली आहे. स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार हि योजना सुरू झाल्यापासुन सुमारे 2,70,000 कुटूंबे हि दारिद्र्यरेषेखालून(बी.पी.एल ) दारिद्र्यरेषेवर (ए.पी.एल) आली आहेत.

या योजने अंतर्गत अद्यापी 2,25,000 गट स्थ्यापन करण्याचे शासनाचे उदिष्ट आहे. राज्यभर स्थापन झालेल्या गटांची मोठी संख्या विचारात घेता, या गटांची सर्वकष अद्यावत माहिती एके ठिकाणी उपलब्ध असणे आवश्यक झाले आहे.

सदर आवश्यकता खालील कारणांमळे प्रकर्षाने जाणवते :-

क)  स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजने अंतर्गत सहाय्यीत बचत गटांची सुची करण्याबाबत केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालय, कृषि भवन, नवी दिल्ली यांनी विहित नमुण्यामध्ये राज्य शासनाकडून माहिती मागविली आहे. सदर माहिती विस्तृत स्वरूपात असून ती एकत्रितरित्या असणे अत्यंत उपयुक्त आहे.

ख) स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजने अंतर्गत स्थापित स्वयंसहायता गटाचे संघीकरण करण्याचा निर्णय शासनाने दिनांक 6 जुलै, 2009 च्या शासन निर्णयान्वये घेतला. या संघीकरणासाठी व संघीकरणाच्या बळकटीकरणासाठी स्वयंसहायता गटाबाबतची संपूर्ण एकत्रित माहिती तालूका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर असणे आवश्यक आहे.

खालील लिंक्सवर क्लिक करा

बचत गटांच्या समृध्दीसाठी कटिबध्द...
आपली राज्यस्तरीय टिम...
मा ना .श्रीमती पंकजा गोपीनाथराव मुंडे
मा. मंत्री - ग्रामविकास
मा.ना. श्री दिपक केसरकर

मा. राज्यमंत्री - ग्रामविकास

श्री. वि. गिरीराज भा.प्र.से.
मा. सचिव - ग्रामविकास
Disclaimer |   Privacy Policy |  Copyrights Powered by Logix